मराठी » इंग्रजी UK   देश आणि भाषा


५ [पाच]

देश आणि भाषा

-

5 [five]

Countries and Languages

५ [पाच]

देश आणि भाषा

-

5 [five]

Countries and Languages

मजकूर पाहाण्यासाठी क्लिक कराः   
मराठीEnglish UK
जॉन लंडनहून आला आहे. Jo-- i- f--- L-----.
लंडन ग्रेट ब्रिटनमध्ये आहे. Lo---- i- i- G---- B------.
तो इंग्रजी बोलतो. He s----- E------.
   
मारिया माद्रिदहून आली आहे. Ma--- i- f--- M-----.
माद्रिद स्पेनमध्ये आहे. Ma---- i- i- S----.
ती स्पॅनीश बोलते. Sh- s----- S------.
   
पीटर आणि मार्था बर्लिनहून आले आहेत. Pe--- a-- M----- a-- f--- B-----.
बर्लिन जर्मनीमध्ये आहे. Be---- i- i- G------.
तुम्ही दोघेही जर्मन बोलता का? Do b--- o- y-- s---- G-----?
   
लंडन राजधानीचे शहर आहे. Lo---- i- a c------ c---.
माद्रिद आणि बर्लिनसुद्धा राजधानीची शहरे आहेत. Ma---- a-- B----- a-- a--- c------ c-----.
राजधानीची शहरे मोठी आणि गोंगाटाची असतात. Ca----- c----- a-- b-- a-- n----.
   
फ्रांस युरोपात आहे. Fr---- i- i- E-----.
इजिप्त आफ्रिकेत आहे. Eg--- i- i- A-----.
जपान आशियात आहे. Ja--- i- i- A---.
   
कॅनडा उत्तर अमेरीकेत आहे. Ca---- i- i- N---- A------.
पनामा मध्य अमेरीकेत आहे. Pa---- i- i- C------ A------.
ब्राझील दक्षिण अमेरीकेत आहे. Br---- i- i- S---- A------.
   

भाषा आणि पोटभाषा (बोली)

जगभरात 6000 ते 7000 विविध भाषा आहेत. त्यांच्या पोटभाषांची संख्या अर्थात खूप आहे. पण भाषा आणि पोटभाषा यात फरक काय आहे? पोटभाषेला नेहमी विशिष्ट स्थानानुरूप सूर असतो. ते स्थानिक भाषेच्या विविध प्रकाराला अनुसरून असतात. म्हणजेच पोटभाषा ही एक मर्यादित पल्ला असलेली भाषा आहे. एक सर्वसाधारण नियम म्हणजे पोटभाषा ही फक्त बोलली जाते, लिहिली जात नाही. ते स्वतःची एक भाषिक पद्धत बनवतात. ते स्वतःचे नियम अवलंबतात. सिद्धांताप्रमाणे प्रत्येक भाषेच्या अनेक पोटभाषा असतात. सर्व पोटभाषा राष्ट्राच्या प्रमाणभूत भाषेच्या अंतर्गत येतात. प्रमाणभूत भाषा राष्ट्रातल्या सर्व लोकांना समजते. त्यामुळेच भिन्न पोटभाषा बोलणारे लोक एकमेकांशी  परस्पर संपर्क साधू शकतात.

जवळ जवळ सर्व पोटभाषा कमी महत्वाच्या होत आहेत. शहरांमध्ये क्वचितच पोटभाषा बोलली जाते. प्रमाणभूत भाषा सहसा बोलली जाते. म्हणून, पोटभाषा बोलणारे अनेकदा साधे आणि अशिक्षित समजले जातात. आणि तरीही ते एका सामाजिक पातळीवर भेटतात. म्हणजेच पोटभाषा बोलणारे बाकीपेक्षा कमी बुद्धिमान असतात असे नाही. बर्‍याच वेळा विरुद्ध! जे लोक पोटभाषा बोलतात त्यांना बरेच फायदे आहेत. उदाहरणार्थ, भाषिक अभ्यासक्रमात. पोटभाषा बोलणार्‍याना विविध भाषिक शैली माहित असतात. आणि त्यांनी भाषिक शैलींदरम्यान त्वरित कसे बदलावे हे शिकून घेतले आहे. म्हणून, पोटभाषा बोलणारे लोक परिवर्तनासाठी जास्त सक्षम असतात. त्यांना कुठली भाषिक शैली कोणत्या ठराविक परिस्तिथीला अनुसरून आहे याचे ज्ञान असते. वैज्ञानिकदृष्टया ही हे सिद्ध झाले आहे. म्हणून पोटभाषेचा वापर करायचे धाडस करा. ती श्रेयस्कर आहे.