मराठी » जपानी   काम


५५ [पंचावन्न]

काम

-

55 [五十五]
55 [Gojūgo]

仕事
shigoto

५५ [पंचावन्न]

काम

-

55 [五十五]
55 [Gojūgo]

仕事
shigoto

मजकूर पाहाण्यासाठी क्लिक कराः   
मराठी日本語
आपण काय काम करता? ご職---
g- s------- w-?
माझे पती डॉक्टर आहेत. 夫は-----
o--- w- i-------.
मी अर्धवेळ पारिचारिका म्हणून काम करते. パー-------------------
p-------- n- k------- t- s---- k---- s---- i----.
   
आम्ही लवकरच आमचे पेन्शन घेणार आहोत. もう---------
m----- n----- s-----------.
पण कर खूप जास्त आहेत. でも--------
d--- z----- g- t--------.
आणि आरोग्य विमा महाग आहे. 健康--------
k--------- m- t--------.
   
तुला आयुष्यात पुढे कोण बनायचे आहे? あな---------------
a---- w-- s----- n--- n- n---------- k-?
मला इंजिनियर व्हायचे आहे. エン---------
e------ n- n------.
मला महाविद्यालयात जाऊन उच्चशिक्षण घ्यायचे आहे. 大学-----------
d------ d- b----- s--- t----------.
   
मी प्रशिक्षणार्थी आहे. 研修----
k------------.
मी जास्त कमवित नाही. 稼ぎ------------
k----- w- a---- ō-- a-------.
मी विदेशात प्रशिक्षण घेत आहे. 外国--------------
g------ d- i---------- o s------.
   
ते माझे साहेब आहेत. こち---------
k------ g- w------ n- j--------.
माझे सहकारी चांगले आहेत. 同僚------
d---- w- s------------.
दुपारचे जेवण आम्ही कँटिनमध्ये घेतो. お昼--------------
o---- w- i----- s---- s------ n- i------.
   
मी नोकरी शोधत आहे. 仕事--------
s------ o s-------------.
मी वर्षभर बेरोजगार आहे. もう---------
m- i------- m- s----------------.
या देशात खूप जास्त लोक बेरोजगार आहेत. この------------
k--- k--- w- s------------ g- ō s-------.
   

स्मरणशक्तीला भाषेची गरज आहे

बर्‍याच लोकांना त्यांचा शाळेतला पहिला दिवस आठवतो. परंतु, त्यांना त्याच्या आधीचे आठवत नाही. आपल्याला आयुष्यातील सुरुवातीच्या वर्षांबद्दल काहीच आठवत नाही. पण असं का ? लहान मूल असतानाचे अनुभव आपण का आठवू शकत नाही? याचे कारण, आपल्या विकासामध्ये आहे. संवादशक्ती आणि स्मरणशक्ती एकाच वेळी विकसित होतात. आणि म्हणून एखादी गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी, माणसाला संवादशक्ती लागते. म्हणजेच, त्याला गोष्टी अनुभवण्यासाठी शब्दांची गरज भासते. शास्त्रज्ञांनी मुलांवर बरीच परीक्षणे केलेली आहेत. ते करतेवेळी, त्यांनी चित्तवेधक शोध लावला. ज्या वेळी मुलं बोलायला शिकतात, त्यावेळी ते त्या आधीच्या सर्व गोष्टी विसरतात. म्हणून संवादशक्तीची सुरवात म्हणजेच स्मरणशक्तीची सुरुवात आहे.

मुलं खूप सार्‍या गोष्टी पहिल्या 3 वर्षांमध्ये शिकतात. ते रोज नवीन गोष्टींचा अनुभव घेतात. त्यांना खूप सारे महत्त्वाचे अनुभवसुद्धा या वयातच होतात. तरीदेखील, ते हे सर्व विसरतात. मानसशास्त्रज्ञ या घटनेला इन्फाटाईल अम्नेशिया [तान्ह्या मुलांचा स्मृतिभ्रंश] असे म्हणतात. मुलं ज्या गोष्टींना नावे देतात तीच फक्त त्यांच्या लक्षात राहतात. आत्मचरित्रात्मक स्मरणशक्ती वैयक्तिक अनुभव जपते. ते एका रोजनिशीसारखे काम करते. आपल्या आयुष्यात जे काही महत्त्वाचे असते ते स्मृतीत कायमचे साठविले जाते. याप्रकारे, आत्मचरित्रात्मक स्मरणशक्ती आपली ओळख बनविते. पण तिचा विकास मूळ भाषेवर अवलंबून असतो. आणि आपण आपल्या स्मरणशक्तीला फक्त संवादशक्तीनेच कार्‍यान्वित करू शकतो. अर्थात, आपण ज्या गोष्टी लहान मूल असताना शिकलेलो असतो त्या सर्वच खरंच पुसल्या जात नाहीत. ते आपल्या मेंदूत कुठेतरी जतन केलेले असतात. एवढेच की आपल्याला ते उपलब्ध नसतात. ही लाजिरवाणी गोष्ट आहे, नाही का ?