वाक्प्रयोग पुस्तक

सकारात्मक भाषा आणि नकारात्मक भाषा

ar AR de DE em EM en EN es ES fr FR it IT ja JA pt PT px PX zh ZH af AF be BE bg BG bn BN bs BS ca CA cs CS el EL eo EO et ET fa FA fi FI he HE hr HR hu HU id ID ka KA kk KK kn KN ko KO lt LT lv LV mr MR nl NL nn NN pa PA pl PL ro RO ru RU sk SK sq SQ sr SR sv SV tr TR uk UK vi VI

सकारात्मक भाषा आणि नकारात्मक भाषा

बहुतांश लोक आशावादी किंवा निराशावादी असतात. पण त्याशिवाय भाषांसाठीही हे लागू पडते! शास्त्रज्ञांनी वारंवार भाषेमधील शब्दांच्या अर्थांचे विश्लेषण केले आहे. ते करत असताना त्यांना विस्मयकारक निष्कर्ष मिळाले. उदाहरणार्थ, इंग्रजीमध्ये नकारात्मक शब्द होकारार्थी शब्दापेक्षाही जास्त आहेत. नकारात्मक भावनांचे शब्द होकारार्थी शब्दाच्या जवळजवळ दुप्पट आहेत. पाश्चात्य समाजातील वक्त्यांचा शब्दसंग्रहावर प्रभाव असतो. त्या ठिकाणी लोक अनेकदा तक्रार करत. ते बर्‍याच गोष्टींवर टीका करत असत. त्यामुळे ते पूर्णपणे अधिक प्रमाणावर नकारात्मक स्वराने भाषा वापरतात. पण नकारार्थी शब्दही काही कारणास्तव मजेशीर असतात. त्यांमध्ये होकारार्थी शब्दांपेक्षा जास्त माहिती असते. याचे कारण आपल्या उत्क्रांतीमध्ये सापडू शकते. धोके ओळखणे हे सर्व सजीव गोष्टींसाठी नेहमी महत्त्वाचे होते. ते धोक्यास त्वरीत प्रतिक्रिया देऊ लागले. त्याशिवाय, ते इतरांना धोक्यांबाबत बजावत होते. त्यामुळे अत्यंत जलद माहिती पुढे पुरवणे आवश्यक होते. जास्तीत जास्त शक्य झाल्यास कमी शब्दांत सांगितले पाहिजे. त्याव्यतिरिक्त, नकारात्मक भाषेचे कोणतेही वास्तविक फायदे नाहीत. असे कोणालाही कल्पना करणे सोपे आहे. जे लोक केवळ नकारात्मक बोलतात ते नक्कीच खूप लोकप्रिय नसतात. शिवाय, नकारात्मक भाषा आपल्या भावनांवर परिणाम करते. दुसरीकडे, सकारात्मक भाषा आशावादी परिणाम करू शकते. जे लोक नेहमी सकारात्मक आहेत त्यांच्या कारकिर्दीमध्ये अधिक यश असते. त्यामुळे आपण अधिक काळजीपूर्वक आपली भाषा वापरली पाहिजे. कारण आपण तो शब्दसंग्रह निवडतो ज्याचा वापर आपण करतो. तसेच आमच्या भाषेत आम्ही आमचे खरेपण तयार केले पाहिजे. म्हणून: सकारात्मक बोला!