वाक्प्रयोग पुस्तक

मातृभाषा दिवस

ar AR de DE em EM en EN es ES fr FR it IT ja JA pt PT px PX zh ZH af AF be BE bg BG bn BN bs BS ca CA cs CS el EL eo EO et ET fa FA fi FI he HE hr HR hu HU id ID ka KA kk KK kn KN ko KO lt LT lv LV mr MR nl NL nn NN pa PA pl PL ro RO ru RU sk SK sq SQ sr SR sv SV tr TR uk UK vi VI

मातृभाषा दिवस

तुम्ही तुमच्या मातृभाषेवर प्रेम करता? मग भविष्यात तुम्ही त्यावरचे प्रेम साजरे केले पाहिजे! आणि नेहमी फेब्रुवारी 21 ला! तोच आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस आहे. तो 2000 पासून दरवर्षी साजरा केला जात आहे. युनेस्कोने ह्या दिवसाची स्थापना केली. युनेस्को एक संयुक्त राष्ट्र (युएन) संस्था आहे. ते विज्ञान, शिक्षण आणि संस्कृती विषयांवर संबंधित आहेत. मानवतेचा सांस्कृतिक वारसा संरक्षण करण्यासाठी युनेस्को प्रयत्नशील आहे. भाषा सांस्कृतिक वारसा पण असतात. म्हणून त्यांचं संरक्षण, संवर्धन आणि प्रचार करायला हवा. भाषिक विविधता दिवस 21 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. जगभरात 6000 ते 7000 भाषा आहेत असा अंदाज आहे. त्यातून अर्ध्याहून अधिक भाषांवर विलोपानाचा धोका आहे. प्रत्येकी 2 आठवड्यात एक भाषा विलुप्त होते. प्रत्येक भाषेत ज्ञानाचे अफाट धन आहे. देशातल्या लोकांचे ज्ञान भाषेत समाविष्ट असते. देशाचा इतिहास भाषेतून परावर्तीत होतो. अनुभव आणि परंपरा सुद्धा भाषेतून पारित होते. या कारणांमुळेच उपजत भाषा ही देशाच्या अनन्यतेचा घटक आहे. जेव्हा एक भाषा संपुष्टात येते तेव्हा शब्दांपेक्षा बरेच काही विलुप्त होते. या सर्व गोष्टींना 21 फेब्रुवारीला उजाळा द्यावा. लोकांना कळावे की भाषेला काय अर्थ असतो. आणि त्यांनी हे परावर्तीत केले पाहिजे की ते भाषेच्या सुरक्षेसाठी काय करू शकतात. म्हणून दाखवून द्या की भाषा तुमच्यासाठी महत्वाची आहे. तुम्ही त्यासाठी एक केक बनवू शकता? आणि त्यावर मिठाईद्वारे सुंदरसे लेखन करा. अर्थात, आपल्या मातृभाषेत!