वाक्प्रयोग पुस्तक

प्राण्यांच्या भाषा

ar AR de DE em EM en EN es ES fr FR it IT ja JA pt PT px PX zh ZH af AF be BE bg BG bn BN bs BS ca CA cs CS el EL eo EO et ET fa FA fi FI he HE hr HR hu HU id ID ka KA kk KK kn KN ko KO lt LT lv LV mr MR nl NL nn NN pa PA pl PL ro RO ru RU sk SK sq SQ sr SR sv SV tr TR uk UK vi VI

प्राण्यांच्या भाषा

जेव्हा आपल्याला स्वतःला व्यक्त करायचे असेल तेव्हा, आपण आपले उच्चार वापरतो. त्याचप्रमाणे प्राण्यांनादेखील त्यांची स्वत:ची भाषा असते. आणि ते अगदी मानवांप्रमाणे त्याचा उपयोग करतात. असे म्हणायचे आहे कि, माहिती देवाणघेवाण करण्यासाठी एकमेकांशी बोलतात. मूलतः प्रत्येक प्राणी प्रजातीस एक विशिष्ट भाषा असते. वाळवी देखील एकमेकांशी संवाद साधत असतात. धोक्यामध्ये, ते जमिनीवर त्यांचे शरीर तडकावितात. हे एकमेकांना सूचना देण्याचा हा त्यांचा मार्ग आहे. इतर प्राणी प्रजातींचा शत्रूशी संपर्क येतो तेव्हा ते शिट्टी वाजवितात. मधमाशा नृत्याच्या माध्यमातून एकमेकांशी बोलतात. या माध्यमातून इतर मधमाशांच्या काहीतरी खाण्यायोग्य वस्तू असल्याचे दाखवितात. देवमासा 5,000 किलोमीटर दूरपर्यंत ऐकला जाऊ शकेल असा आवाज करतात. ते विशिष्ट गाण्यांच्या माध्यमातून एकमेकांशी संभाषण साधत असतात. हत्ती देखील एकमेकांना विविध ध्वनिविषयक संकेत देतात. परंतु मानव त्यांना ऐकू शकत नाही. अधिकांश प्राण्यांच्या भाषा फार क्लिष्ट असतात. त्यामध्ये भिन्न चिन्ह संकेतांचे संयोजन केलेले असते. ध्वनिविषयक, रासायनिक आणि दृष्टीविषयक संकेतांचा वापर केला जातो. एकीकडे, प्राणी विविध हावभाव संकेतही वापरतात. याद्वारे, मानव पाळीव प्राण्यांच्या भाषा शिकले आहेत. कुत्रे कधी आनंदी असतात हे त्यांना माहित असते. आणि मांजराला केव्हा एकटे राहायचे असते हे ते ओळखू शकतात. तथापि, कुत्रे आणि मांजर अतिशय भिन्न भाषा बोलतात. अनेक संकेत अगदी एकदम विरुद्ध असतात. यावर दीर्घ काळापासून विश्वास ठेवण्यात आला आहे कि, हे दोन प्राणी एकमेकांना पसंत करत नाहीत. परंतु ते फक्त एकमेकांबद्दल गैरसमज करून घेतात. त्या कुत्रे आणि मांजर यांच्या दरम्यान अडचणी ठरू शकतात. त्यामुळे अगदी प्राणीसुद्धा गैरसमजाच्या कारणामुळे एकमेकांशी लढत असतात...