वाक्प्रयोग पुस्तक

लॅटिन, एक जिवंत भाषा?

© karelnoppe - stock.adobe.com | Diverse group of kids together in garden.
ar AR de DE em EM en EN es ES fr FR it IT ja JA pt PT px PX zh ZH af AF be BE bg BG bn BN bs BS ca CA cs CS el EL eo EO et ET fa FA fi FI he HE hr HR hu HU id ID ka KA kk KK kn KN ko KO lt LT lv LV mr MR nl NL nn NN pa PA pl PL ro RO ru RU sk SK sq SQ sr SR sv SV tr TR uk UK vi VI

लॅटिन, एक जिवंत भाषा?

आज, इंग्रजी ही सर्वात महत्त्वाची सार्वत्रिक भाषा आहे. ही जगभरात सर्वत्र शिकवली जात आहे आणि अनेक राष्ट्रांमध्ये ही अधिकृत भाषा आहे. त्याआधी, लॅटिन ही भाषा ती भूमिका पार पाडत होती. लॅटिन ही मूळ रुपात लॅटिन लोक बोलायचे. ते लोक लॅटियमचे मूळ स्थानिक होते, आणि रोम हे त्यांचे केंद्र होते. रोमन साम्राज्याच्या विस्तारासह ही भाषासुद्धा पसरली. प्राचीन जगामध्ये, लॅटिन ही बर्‍याच लोकांची मूळ भाषा होती. ते युरोप, उत्तर आफ्रिका आणि मध्य पूर्वेला वास्तव्याला होते. तथापि, बोलली जाणारी लॅटिन ही शास्त्रीय लॅटिनपेक्षा भिन्न होती. ती देशी भाषा होती, तिला अशिष्ट लॅटिन असे म्हणतात. रोमन लोकांच्या विभागामध्ये विविध वाक्यरचना होती. मधल्या काळामध्ये, राष्ट्रीय भाषेची उत्क्रांती ही वाक्यरचनेपासून झाली. भाषा ज्या लॅटिनपासून निर्माण झाल्या, त्या म्हणजे रोमान्स भाषा. त्यात इटालियन, स्पॅनिश आणि पोर्तुगीज या भाषांही समाविष्ट आहे. फ्रेंच आणि रोमानियनदेखील लॅटिन भाषेवर आधारित आहेत. पण लॅटिन भाषा अजूनही मरण पावलेली नाही. 19 व्या शतकापर्यंत ती महत्त्वाची व्यावसायिक भाषा होती. आणि ती शिक्षित भाषा राहिली. लॅटिन भाषेला विज्ञानामध्ये खूप महत्त्व आहे. अनेक तांत्रिक संज्ञांचे मूळ लॅटिनमध्ये आहे. शिवाय, अजूनही अनेक शाळांमध्ये परदेशी भाषा म्हणून लॅटिन शिकविली जाते. विद्यापीठांची अशी इच्छा आहे कि, लॅटिनची माहिती असावी. लॅटिन ही सध्या बोलली जात नसली तरीही तिचा अंत झालेला नाही. लॅटिन ही भाषा येत्या काळात परतीचा अनुभव घेत आहे. ज्या लोकांना लॅटिनबद्दल जाणून घ्यायचे आहे त्यांच्या संख्येतसुद्धा पुन्हा वाढ होऊ लागली आहे. ती अजूनही अनेक देशांच्या भाषा आणि संस्कृतीची गुरुकिल्ली मानली जाते. अंगात हिंम्मत बाळगा लॅटिन शिकण्याची! औडासेस फोर्चुना अदिऊवत[Audaces fortuna adiuvat], चांगले भविष्य शूरांची मदत करते.