वाक्प्रयोग पुस्तक

भाषांचे भविष्य

ar AR de DE em EM en EN es ES fr FR it IT ja JA pt PT px PX zh ZH af AF be BE bg BG bn BN bs BS ca CA cs CS el EL eo EO et ET fa FA fi FI he HE hr HR hu HU id ID ka KA kk KK kn KN ko KO lt LT lv LV mr MR nl NL nn NN pa PA pl PL ro RO ru RU sk SK sq SQ sr SR sv SV tr TR uk UK vi VI

भाषांचे भविष्य

1.3 अब्ज पेक्षा जास्त लोक चायनीज बोलतात. यामुळे चायनीज ही भाषा जगामध्ये सर्वात जास्त बोलणारी भाषा ठरते. येणार्‍या अनेक वर्षांमध्ये हे असेच राहणार आहे. बाकीच्या भाषांचे भविष्य इतकेसे सकारात्मक दिसत नाही. कारण अनेक स्थानिक भाषांचे अस्तित्व नष्ट होईल. सध्या जवळजवळ 6000 भाषा बोलल्या जातात. परंतु, तज्ञांच्या मते बहुसंख्य भाषांचे विलोपन होईल. जवळजवळ 90% भाषा या नष्ट होतील. त्यापैकी बर्‍याच भाषा या शतकातच नष्ट होतील. याचा अर्थ, भाषा या प्रत्येक दिवशी नष्ट पावतील. भविष्यामध्ये वैयक्तिक भाषेचा अर्थ देखील बदलेल. इंग्रजी ही भाषा दुसर्‍या क्रमांकावर आहे. परंतु, मूळ भाषिकांची संख्या स्थिर राहत नाही. जनसंख्या मधील विकास हा यास कारणीभूत आहे. काही दशकानंतर, बाकीच्या भाषा प्रभुत्त्व गाजवतील. हिंदी/उर्दू आणि अरेबिक लवकरच दुसर्‍या आणि तिसर्‍या स्थानावर असतील. इंग्रजी चौथ्या स्थानी असेल. जर्मन पहिल्या दहातून अदृश्य होईल. मलाय ही भाषा महत्वाच्या भाषेच्या गटामध्ये मोडेल. बाकीच्या भाषा नष्ट पावत आहेत तर नवीन भाषा जन्माला येतील. त्या मिश्र जातीय भाषा असतील. या मिश्र भाषा इतर कोणत्याही ठिकाणापेक्षा शहरांत जास्त बोलल्या जातील. भाषेचे संपूर्ण वेगळे रूप देखील विकसित होईल. म्हणून भविष्यात इंग्रजी भाषेची संपूर्णतः वेगवेगळी रूपे पहावयास मिळतील. जगभरामध्ये द्वि-भाषिक लोकांची संख्या वाढेल. भविष्यामध्ये आपण कसे बोलू हे अजून स्पष्ट झालेले नाही. परंतु, तरीही 100 वर्षांमध्ये अनेक भाषा येतील. म्हणून शिकणे लगेच थांबणार नाही.