वाक्प्रयोग पुस्तक

चित्रांची भाषा

ar AR de DE em EM en EN es ES fr FR it IT ja JA pt PT px PX zh ZH af AF be BE bg BG bn BN bs BS ca CA cs CS el EL eo EO et ET fa FA fi FI he HE hr HR hu HU id ID ka KA kk KK kn KN ko KO lt LT lv LV mr MR nl NL nn NN pa PA pl PL ro RO ru RU sk SK sq SQ sr SR sv SV tr TR uk UK vi VI

चित्रांची भाषा

जर्मन म्हण: चित्र हजारो शब्दांपेक्षा अधिक काही सांगते. म्हणजेच शब्दांपेक्षा चित्र पटकन समजली जातात. चित्रे अधिक चांगल्या पद्धतीने भावना प्रकट करू शकतात. यामुळेच, जाहिरातीमध्ये अनेक चित्रे वापरली जातात. भाषा चित्रापेक्षा वेगळे कार्य करते. ते आपल्याला एकत्रितपणे बर्‍याच गोष्टी एकाचवेळी दाखवतात. याचाच अर्थ असा की, संपूर्ण प्रतिमेचा एक विशिष्ट परिणाम आहे. भाषणामध्ये बरेच शब्द लागतात. परंतु, प्रतिमा आणि भाषण एकत्र असतात. चित्राचे वर्णन करण्यासाठी आपल्याला भाषणाची गरज असते. अशाच पद्धतीने बरीच पुस्तके ही प्रतिमेंच्या माध्यमातून समजली जातात. भाषा तज्ञांनी प्रतिमा आणि भाषण यांमधील संबंध अभ्यासले आहेत. हे देखील प्रश्न उपस्थित करते की, चित्रे ही एक भाषा आहे का. जर काही चित्रित केलेले असेल तर आपण प्रतिमांकडे पाहू शकतो. परंतु, चित्रपटाचा संदेश ठोस नाही. जर प्रतिमेला भाषणाचे कार्य करावयाचे असेल तर, ते ठोसच हवे. ते जेवढे कमी दाखवतील तेवढा निरोप स्पष्ट पोहोचेल. चित्रकृती याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. चित्रकृती हे अतिशय साधे असून ते चित्राची प्रतीके स्पष्ट दर्शवितात. ते शाब्दिक भाषेची जागा घेतात आणि ते दृश्यमान संभाषणाचा एक प्रकार आहे. प्रत्येकाला उदाहारणार्थ धुम्रपान करू नये यासाठीची चित्रकृती माहिती असेल. ते सिगारेटवरून जाणारी रेषा दाखवते. जागतीकरणामुळे प्रतिमा महत्वाच्या होत चालल्या आहेत. परंतु, तुम्हाला प्रतिमांची भाषा देखील अभ्यासावी लागेल. जरी खूप जण तसे समजत असतील तरीही जगभरात ती समजली जात नाही. कारण आपल्या प्रतिमेच्या समजुतीवर आपल्या संस्कृतीचा मोठा पगडा आहे. जे आपण पाहतो ते अनेक घटकांवर अवलंबून असते. म्हणून काही लोक सिगारेट पाहत नाहीत तर फक्त त्यावरील ठळक रेषा पाहतात.