वाक्प्रयोग पुस्तक

बदलती भाषा = बदलते व्यक्तिमत्व

ar AR de DE em EM en EN es ES fr FR it IT ja JA pt PT px PX zh ZH af AF be BE bg BG bn BN bs BS ca CA cs CS el EL eo EO et ET fa FA fi FI he HE hr HR hu HU id ID ka KA kk KK kn KN ko KO lt LT lv LV mr MR nl NL nn NN pa PA pl PL ro RO ru RU sk SK sq SQ sr SR sv SV tr TR uk UK vi VI

बदलती भाषा = बदलते व्यक्तिमत्व

आमच्या भाषा आमच्या स्वाधीन आहेत. ते आपल्या व्यक्तिमत्वाचा एक महत्वाचा भाग आहे. परंतु, अनेक लोक अनेक भाषा बोलतात. याचा अर्थ त्यांची वेगवेगळी व्यक्तिमत्त्वे आहेत असा होतो? संशोधक म्हणतात होय! जेव्हा आपण भाषा बदलतो तेव्हा आपण आपले व्यक्तिमत्व देखील बदलतो. असे म्हणता येईल की, आपण वेगळ्या पद्धतीने वागतो. अमेरिकेचे शास्त्रज्ञ या निष्कर्षाप्रत पोहोचले आहेत. त्यांनी द्विभाषीय महिलांच्या वर्तनाचा अभ्यास केला आहे. त्या महिला इंग्रजी आणि स्पॅनिश वापरत मोठ्या झाल्या आहेत. त्या दोन्हीही भाषा आणि संस्कृतीशी सारख्याच परिचित होत्या. असे असूनही त्यांचे वर्तन भाषेवर अवलंबून होते. जेव्हा त्या स्पॅनिश बोलायच्या तेव्हा त्यांचा आत्मविश्वास अधिक होता. जेव्हा त्यांच्या आजूबाजूचे लोक स्पॅनिश बोलायचे तेव्हा तेव्हा देखील त्यांना ते सोईस्कर जायचे. जेव्हा त्या इंग्रजी बोलायच्या तेव्हा त्यांचे वर्तन बदलायचे. तेव्हा त्यांचा आत्मविश्वास कमी होता आणि त्या स्वतः बदल अनिश्चित असायच्या. संशोधकांना आढळून आले की महिला या एकाकी होत्या. म्हणून जी भाषा आपण बोलतो त्या भाषेचा आपल्या वर्तनावर परिणाम होतो. असे का ते संशोधकांना अद्याप माहिती नाही. कदाचित असे आपल्या संस्कृतीच्या परंपरेमुळे असेल. जेव्हा आपण बोलतो, तेव्हा ज्या संकृतीमधून ती भाषा आली आहे त्या बद्दल आपण विचार करतो. हे आपोआपच घडते. त्यामुळे आपण संस्कृतीक परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो. आपण त्या संस्कृतीच्या पारंपारिक रुढीप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो. चायनीज भाषिक या प्रयोगामध्ये अतिशय आरक्षित होते. जेव्हा ते इंग्रजी बोलत होते तेव्हा ते अतिशय मोकळे होते. कदाचित अतिशय चांगल्या पद्धतीने एकरूप होण्यासाठी आपण आपले वर्तन बदलतो. ज्याच्या बरोबर आपल्याला बोलायचे आहे त्याच्या प्रमाणे आपल्याला होणे आवडते.