वाक्प्रयोग पुस्तक

भाषिक अलौकिकता

ar AR de DE em EM en EN es ES fr FR it IT ja JA pt PT px PX zh ZH af AF be BE bg BG bn BN bs BS ca CA cs CS el EL eo EO et ET fa FA fi FI he HE hr HR hu HU id ID ka KA kk KK kn KN ko KO lt LT lv LV mr MR nl NL nn NN pa PA pl PL ro RO ru RU sk SK sq SQ sr SR sv SV tr TR uk UK vi VI

भाषिक अलौकिकता

बहुतेक लोक जेव्हा ते एक परदेशी भाषा बोलू शकतात तेव्हा खूप खुश असतात. परंतु काही लोक देखील 70 भाषांपेक्षा जास्त भाषांमध्ये कुशल आहेत. ते या सर्व भाषा अस्खलिखितपणे बोलू आणि अचूकपणे लिहू शकतात. ते नंतर असेही म्हटले जाऊ शकते कि काही लोक कमालीचे - बहुभाषिक आहेत. बहुभाषिकता शतकानुशतके आहे. अशा प्रकारच्या प्रतिभेच्या अनेक लोकांचे अहवाल आहेत. ही क्षमता कोठून येते हे अद्याप संशोधित झालेले नाही. यावर विविध वैज्ञानिक सिद्धांत आहेत. काहींचा बहुभाषिक व्यक्तींच्या मेंदूंच्या रचना वेगळ्या असल्याचा विश्वास आहे. हा फरक विशेषतः ब्रोका [Broca] केंद्रात दृश्यमान असतो. उच्चार मेंदूच्या या भागात उत्पन्न होतात. या विभागाच्या पेशी बहुभाषिक लोकांमध्ये वेगळ्या पद्धतीने बनलेल्या असतात. त्यांच्याकडून एक चांगला परिणाम म्हणून माहितीची प्रक्रिया करणे शक्य आहे. तथापि, या सिद्धांतांची पुष्टी करण्यासाठी पुढील अभ्यासात कमतरता आहेत. कदाचित काय निर्णायक आहे ही फक्त एक अपवादात्मक प्रेरणा आहे. मुले इतर मुलांकडून फार पटकन परदेशी भाषा शिकतात. कारण खेळताना ते भाषेचे मिश्रण करू इच्छिण्याच्या वस्तुस्थितीमुळे असे घडते. त्यांना समूहाचा एक भाग व्हायचे असते आणि इतरांशी संवाद साधायचा असतो. त्या म्हणण्यासह, त्यांचे शिकण्याचे यश त्यांनी अंतर्भूत केलेल्या त्यांच्या इच्छेवर अवलंबून असते. दुसरा सिद्धांत हे सूचित करतो कि, मेंदूसंबंधीची बाब शिकण्याचा माध्यमातूनविकसित होत असते. अशा प्रकारे, आपण अधिक शिकतो, त्याप्रमाणे शिकणे सोपे बनते. ज्या भाषा एकमेकांसमानच असतात त्या शिकण्यासाठी देखील सोप्या असतात. म्हणून जी व्यक्ती डॅनिश बोलते ती व्यक्ती स्वीडिश किंवा नॉर्वेजियन भाषा लवकर बोलू शकते. अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. तथापि, काय खात्री आहे कि, बुद्धीमत्ता एक भूमिका बजावत नसते. काही लोक कमी बुद्धिमत्ता असूनही अनेक भाषा बोलतात. पण अगदी महान भाषिक अलौकिक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्तीस भरपूर नियमांचेपालन करणे आवश्यक आहे. हे थोडे दिलासा देणारे आहे, बरोबर ना?