Ј---н --- --- дв----ет и ч-т-р--са-а.
Ј____ д__ и__ д_______ и ч_____ с____
Ј-д-н д-н и-а д-а-е-е- и ч-т-р- с-т-.
-------------------------------------
Један дан има двадесет и четири сата. 0 Je--- ----ima -v-d-se--i če--r---a-a.J____ d__ i__ d_______ i č_____ s____J-d-n d-n i-a d-a-e-e- i č-t-r- s-t-.-------------------------------------Jedan dan ima dvadeset i četiri sata.
जवळजवळ 7 अब्ज लोक पृथ्वीवर राहतात.
आणि ते 7000 वेगवेगळ्या भाषा बोलतात.
लोकांप्रमाणेच भाषा देखील संबंधित असू शकतात.
म्हणून, त्यांचा एकाच स्त्रोतपासून उगम झालेला आहे.
अशा भाषादेखील आहेत ज्या एकाकी आहेत.
त्या वांशिकदृष्ट्या बाकी भाषांशी संबंधित नाहीत.
युरोपमध्ये, 'बास्क' ही भाषा एकाकी समजली जाते.
परंतु, बर्याच भाषांना "जनक", "मुले" किंवा "भावंडे" आहेत.
ते एका विशिष्ट भाषा वंशात मोडतात.
तुम्ही तुलनेने त्या भाषा किती एकसारख्या आहेत हे पाहू शकता.
भाषा तज्ञांनी 300 वेगवेगळ्या आनुवंशिक भाषांचे अस्तित्व मोजले आहे.
त्यांच्यापैकी, 180 वंशांमध्ये 1 पेक्षा अधिक भाषा आहेत.
उरलेल्या 120 भाषा एकाकी आहेत.
सर्वात मोठा भाषेचा वंश हा इंडो-युरोपियन आहे.
त्या वंशामध्ये जवळजवळ 280 भाषा आहेत.
त्यामध्ये रोमान्स, जर्मनीक आणि स्लेविक भाषा आहेत.
जगभरात 3 अब्जांपेक्षा जास्त लोक भाषिक आहेत.
आशिया खंडामध्ये सिनो- तिबेटियन वंशातील भाषा प्रबळ आहे.
ही भाषा 1.3 अब्ज इतके लोक बोलतात.
मुख्य सिनो- तिबेटियन भाषा चायनीज आहे.
तिसरा मोठा भाषा वंश आफ्रिकामध्ये आहे.
त्या भाषेचे नाव तिच्या भौगोलिक स्थानामुळे नायगर-कोंगो असे आहे.
ही भाषा फक्त 350 दशलक्ष लोक बोलतात.
या वंशामध्ये स्वाहिली ही मुख्य भाषा आहे.
पुष्कळशा बाबतीत जेवढे भाषेचे नाते जवळ तेवढी ती समजायला सोपी जाते.
जे लोक संबंधित भाषा बोलतात ते एकमेकांना अधिक चांगल्या रीतीने समजू शकतात.
ते सापेक्षतेने बाकीच्या भाषा पटकन शिकतात.
म्हणून, भाषा शिका - कौटुंबिक पुनर्मीलन नेहमीच आनंददायी असते.